भा.जा.पा. नेता सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी सांगितले कि आधार कार्ड ला खाजगी माहितीशी जोडणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकेदायक होवू शकते. स्वामीने ट्वीट केले कि मी लवकरच माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून कळवणार आहे कि कसे सक्तीने आधार कार्ड ला लोकांच्या खाजगी माहितीशी जोडणे राष्ट्रीय सुरक्षेला शोका ठरू शकते. मला विश्वास आहे कि पंतप्रधान ह्यावर सकारात्मक निर्णय घेतील आणि सर्वोच्च न्यायालय अनेक सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड च्या सक्तीचा निर्णय रद्द करेल. सुप्रीम कोर्टाने सोमवारी सांगितले कि पाच न्यायाधीशांचे एक संविधान पीठ आधार नियमांना खाजगी अधिकारांचे उल्लंघन आणि अनुचित प्रकारे दखल देणाऱ्या सक्तीच्या आधार नियमांवर सुनावणी करेल. हि सुनावणी नोव्हेंबर च्या अंतिम सप्ताहात होईल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews